STORYMIRROR

Savita Mhatre

Romance

1.0  

Savita Mhatre

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
13.9K


पहिलं वहिलं प्रेम कसं वेगळंच भासतं

मनाला भावणारं तसं आगळंच असतं

पहिल्या प्रेमाची गोडी काय बरे वर्णावी

आकंठ प्रेमात बूडत प्रत्येकाने अनुभवावी


सगळं प्रेमात भारी गोडगुलाबी वाटतं

गाली रंग चढताना सगळ्यांना दिसतं

विचारात फक्त एकच माणुस असतं

त्याच्याशिवाय मुळी दुसरं जगच नसतं


स्वप्नांमधली दुनिया वेड लावते मनाला

जागेपणीही स्वप्नच लागतात पडायला

पाहाल तिकडे मग तेच लागतं दिसायला

वेळच नाही लागत स्वत:मध्ये रमायला


येऊनजाऊन एकच विषय फार आवडतो

कुठुनही गेलं तरी त्याच्यावरच थबकतो

होतात जिथेतिथे त्याचेच गोड भास

जाणिवेत हृदयातही तोच असे खास


प्रेमवेडया मनाला नाही येत समजावता

पिसारा मनमोराचा फुले पिंगा घालता

नाही येत मनात दुसरा कुठला विचार

दिवसभर लोचनात तोच दिसे अलवार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance