अबोल तु
अबोल तु
नजरेत अलगद पाहतो तुझ्या
अबोल प्रेम काळजात माझ्या
येऊन स्वप्नांत भातुकली रंगवते
न कळत नाही असं सांगुन लपवते
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधून मधून माझी साथ हवी तुला वाटते
ओठी दडलेल्या भावना तुझ्या मला छेडते
कधी कधी स्वर्गातली परी माझ्यासाठी असते
माझ्या लेखणीचे मोल मला तुझ्यात दिसते
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रागवताच तुझ्या डोळ्यातले प्रेम कळत
मात्र तुझ्यात हरवुन गेल्यासारखं वाटतं
स्नेह हास्याने तुझ्या सार काही विसरुन जातो
आदर आणि प्रेम कस असावं हे तुझ्यात पाहतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अधून मधून नाही माझ काही अस कळत
एकटाच भेभान होऊन कवीतेतच समजत
सारखं सारखं तुला त्रास देणं कठीण असतं
सुख दुःखात सोबत घेऊन चालावं अस वाटतं

