शेतकरी आणि सरकार
शेतकरी आणि सरकार
शेतात सुकली पिके
कोरड पडली रानं
शेतकरी आमचा रडतो बांधावर
झोपले कुठे हो आता सरकार
शेतकरी आमचा पोटाला देतो पीळा
सर्जा आणि राजाला लावीतो लळा
करपलेलं शेत पाहून हृदयात येतं दाटून
हसू येतं का हो सरकार कोरडं खडक पाहून
मूठभर मातीत सोन पिकवितो
रात्र रात्र सर्वांसाठी झोप उडवितो
हरपलेल्या रानामध्ये माणुसकी तुमची कळली हो सरकार
अजून जागी झाले की नाही ही तरी कुठे नाही करार
शेतकरी आमचा बांधावर लटकतो
सरकार पाहून नाही डोकावतो
तळपत्या उन्हात चेहऱ्याची झालेली लाही
आता आम्हाला पाहावत नाही
शेतात माल पाहून भाव
ठरवु नका हो काही
इथे पोटा पाण्याचा प्रश्न पडतो
आता योग्य हमी भाव लावा सरकार
