जुन्या आठवणी
जुन्या आठवणी
बसलं एकांतात कधी की ते
जुने दिवस आठवतात
वसतिगृहाच्या आठवणीं पुन्हा
नव्याने साद घालू लागतात
ती वस्तीगृहाची रात्र म्हणजे आमच्या
आनंदाला आलेली भरती असायची
कारण त्या रात्री गाण्याची स्पर्धा रंगायची
मस्त प्रसंग वातावरण असायचं
शनिवारी रात्री जागताना मात्र
खूप भीती वाटायची
कारण ते आजूबाजूला रात्र किर्रर्र किर्रर्र आवाज
अगोदर आप भीती असायची
तो रविवारचा दिवस म्हणजे
आम्हा सगळ्यांची चंगळ असायची
कारण क्रिकेट खेळायला आमची
सगळी गँग एकत्र यायची
क्रिकेट खेळून झाल्यानंतर वस्तीगृहात प्रवेश करायचं
की नेमकी लाईट जायची
आणि मग काय वायरमनच्या अख्ख्या
खानदानावर शिव्यांची बरसात व्हायची..
आठवते ते दिवस अन जुन्या
आठवणीचा एक हुंदका येतो
आणि नकळत अश्रू एक
थेंब टपकन आठवणी पडतो...
गेले तेे दिवस राहिल्या त्या आठवणी...
