सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
अनाथांची माय हरवली
पाखर आज उदास झाली.
काळाने असा घात केला
जसं काही आयुष्याचं नात नेलं
दुःखाचं आभाळ दाटून येते मनी
हृदयात ढोके जाणून येते ध्यानी
अंधार दाटला चोहीकडे
दिसेना कुठं हो अनाथांची माय.
अनाथांची रानामध्ये वाट चुकली
अश्रू अनावर झाली दिशा कसली
जगी किमया हो न्यारी .
माई जगत विश्व प्यारी.
सुख- दुःख ज्ञानाची तिजोरी माई
अशी होती आमची आई काळाने केली घाई.
जगी थोर तुझे उपकार
सागरा एवढं निर्मळ प्रेमाचा पाझर..
तुमचं देणं हे प्रश्न जगी ठसा उमटविला
विश्व द्यानी येऊन इतिहास हो घडविला.
जागर जाणिवांचा होऊ लागला
हृदयात सर्वांच्या नाव कोरल...
