स्वप्न
स्वप्न
तरुण आणि तरुणांनो वादळ हो उठवा
ज्ञानाची मशाल हाती घेऊन क्रांती हो घडवा
शिखर गाठण्यासाठी अधंज्ञानाची नाही
ज्ञानाचा औचित्य साधवा
*--------------------------------------------*
आता उचलावा लागणार हो पाहुल
मागे सरकून चालणारं नाय त्याला पाहून
मैत्री अंधाराशी झाली तेव्हा वादळातून निघालो
सावल्यातून निघालो जेव्हां शिखर हो गाठलो
*---------------------------------------*
आता अर्थ शब्दात घुसू लागले
वादळ हे नसा-नसातून वाहिले
मशाल घेतली हाती सारेच वादळ मिटून गेले
भाबडे डोळे ही लाल झाले
*--------------------------------------*
आम्ही सारेच एकच आहोत
शिखर गाठण्यासाठी हो एकत्र होऊ
घडवू नवी क्रांती ज्ञानाची ज्योत प्रज्वलित हो लाऊ
उद्याच्या भविष्यासाठी मशाल हाती घेऊन क्रांती हो घडवू
