STORYMIRROR

Savita Mhatre

Fantasy

3  

Savita Mhatre

Fantasy

नसते जीवन सोपे

नसते जीवन सोपे

1 min
130

भयपट जीवनाचा

अंगी उठतो शहारा

कुणा नसते भाकरी

कुणा नसतो निवारा


कष्ट करतो फुकाचे

नसे सुखाचे अंगण

फक्त भरते उदर

नसे मनाला वंगण


कुणी बसतो ऐटीत

पर्वा नसते कुणाची

कुणी राबतो शेतात

वाहे काळजी जगाची


सदा भले करणारा

दु:ख करतो साजरे

रोज दाखवे जो माज

वागे कसे निलाजरे


नसे वाट कधी सोपी

असे अवघड सारे

डोले वादळात नौका

वाहतात किती वारे


असे शेवट चांगला

जरी भयाण आयुष्य 

सोसलेले भूतकाळी

जाते निवांत भविष्य 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy