शिल्पकार जीवनाचा
शिल्पकार जीवनाचा
येते जन्माला बालक
होतो आनंद घराला
जमे गणगोत सारे
लागे उत्साह भराला
वाढे हळुवार बाळ
आईबाबा काळजीत
जिवापाड संभाळती
वेळ जाई चुटकीत
जातो शाळा शिकायला
होतो माॅॅनिटर बाळ
बसे शांत तो वर्गात
करे वर्गाचा संभाळ
वाटे नायक क्षणाचा
त्याला संस्कार चांगले
घेतो निर्णय स्वत:चे
जपे आरोग्य आपले
होतो तरुण मुलगा
घेतो काळजी सर्वांची
शिल्पकार जीवनाचा
नसे जाणीव गर्वाची
होते लग्न योग्यवेळी
वागे सूज्ञ मुलापरी
नाही मागत काहीही
येते घरी सोनपरी
होतो काळ तो व्यतीत
फुल फुले वेलीवरी
होतो पिता तो प्रेमळ
जपे पाखराला जरी
खरा नायक असावा
लढे जीवनी लढाई
नाही बोलत कधीही
नाही मारत बढाई
