जिणं बळीराजाचं
जिणं बळीराजाचं
शेतकरी नित्य राबतोय
दिनभर शेतात कष्टाने
खातो रुखीसुकी भाकरी
उगवतो धान्य किती प्रेमाने
घनघोर पाऊस अवकाळी
फिरवतो पार त्यावर बोळा
विस्कटतो स्वप्नांची रांगोळी
सगळी मेहनत जाते अशी
पार पाण्यात वाहुन
बसतोय आपला बळीराजा
डोक्याला हात लावुन
काय करावे आता कसे
सावकार लागतोय पाठी
पडतोय प्रश्न नेहमीचा
करतोय काळजी कर्जासाठी
नाही पीक येत हातात
जरी पेरलं किती बियाणं
पावसाने घातलाय गोंधळ
चाललंय जिणं वर्षानुवर्ष
नियमीत रिकामी ओंजळ
कुठे मागावी कुणाकडे दाद
पैसे नाहीत त्याच्या गाठीला
पोटात नाही अजिबात अन्न
गेलंय पार कसं खपाटीला
प्रश्न जीवनातले संपत नाही
फास गळ्याचा सरत नाही
