पाहिले न मी तुला...
पाहिले न मी तुला...
पाहिले न मी तुला
तरी मन हे वाहिले
हूरहूर अशी दाटली
गीत स्वप्नी गायिले
वाट का पाहते अशी
जाणिले न मी जरी
काय होते सांग ना
वाटे हीच प्रीत खरी
नाद घुमतो अंतरी
प्रेमकाव्य असे फुले
वार्यावरी लहरींचे
गोड गीत ते झुले
झोक्यावर हळु डोले
मन झाले पार वेडे
हिरवाई आठवते
रुजले हृदयी खेडे
