भोग जीवनाचे...
भोग जीवनाचे...
मिळे नेहमी सर्वांना
असे लिहिलेले भाळी
कुणी राहतो मजेत
कष्ट कुणाला जाळी
नाही चुकले कुणाला
भोग आलेले जीवनी
केला स्वीकार निमूट
फक्त आठवणी मनी
आहे गरीबी कपाळी
देऊ नये कुणा दोष
ठेवा विश्वास कष्टात
मिळे जीवनी संतोष
नाही मिळत काहीही
कधी कुणाला फुकट
मनी तयारी करावी
वाट असावी बिकट
असे मनात सचोटी
देई कष्टांना प्राधान्य
मिळे जीवनी तयाला
नित्य सुख धनधान्य
दिसे कुणी पिचताना
द्यावा मदतीचा हात
मिळे भरुन खजिना
असे ईश्वराची साथ
