मुलांचे भावबंध......
मुलांचे भावबंध......
मिळते मानवाला जन्मापासून नाते
जिथे कायमच असते मोफत खाते
जपतो प्रेमाने नात्यांचे अतूट बंधन
नाते जुळे जगाला नित्य करुन वंदन
नाते जुळते इंद्रधनुच्या सप्तरंगांशी
कधी नदीच्या खळखळत्या पाण्याशी
निसर्गाशी असते जणु मनाने जोडलेले
बालपणी हलकेच हृदयी सामावलेले
मैत्र जिवनाचे मिळती क्षणोक्षणी
चिऊकाऊ असे साथीला बालपणी
मातपित्याशी नाते किती जन्मांतरीचे
मित्रममैत्रिणींशी नाते जरा लाडीगोडीचे
धागे स्नेहभावाचे जुळते अजोड नाते
होई प्रेम जणु क्षणात पापणी लवते
नाही येत कुणाला गणित अशा नात्यांचे
अतूट बंध असती साजरे भाव क्षणांचे
दिवस आठवांचे नित्य सजुन येती दारी
संभाळुन सर्व नात्यांना घेते दुनिया सारी
