होळी
होळी
1 min
143
आला होळीचा महिना
सण करुया साजरा
बने पुरण नैवेद्य
जपु जुनी परंपरा
पौर्णिमेला हुताशनी
होते होलिका दहन
आहे कथा पौराणिक
तसा विचार गहन
करू सर्वांना तयार
जाळू वाईट विचार
आगमनी वसंताच्या
पाळु नवीन आचार
येते रंगांची पंचमी
असे उधळीत रंग
किती रंगले सगळे
झाले खेळण्यात दंग
नको जातीभेद पाळु
खेळु सगळे एकत्र
लावु रंग गालावर
मैत्री पसरू सर्वत्र
पाहु रंगांची किमया
गाऊ जीवन संगीत
नको नीरस जगणे
व्हावे भविष्य रंगीत
