धडे आयुष्याचे....
धडे आयुष्याचे....
1 min
135
वाट माझ्या जीवनाची
जरी असे खडतर
तिने शिकवले मला
धडे किती सुखकर
अशी घडताना मला
वाट मिळाली सुबक
होते खूप निरंतर
तिथे वळण मोहक
वळताना कधी आले
धोकादायी ते दिवस
सरावेत सारे कसे
लागे करावा नवस
शिकवते परिस्थिती
प्रसंगात जगायला
पाय रोवुन मातीत
ताठ उभे राहायला
नवे काही शिकताना
मिळे आयुष्यात धडा
मागे वळुन बघता
ओल्या नयनांच्या कडा
