उन्हाळा
उन्हाळा
झाली तलखी अंगाची
घाम लागे गळायला
करा कामे पटापट
वेळ लागे पळायला
जीव किती व्याकुळला
उरे कामाचा पसारा
पाणी तहान भागेना
दिसे पावसाचा इशारा
करा सारे वाळवण
उन्हे कडक अंगणी
ठेवा पाणी कडधान्य
येेती पाखरे चिमणी
चैन पडेना जिवाला
लागे ओढ पावसाची
भेगा पडती धरेला
उन्हे किती दिवसाची
येतो घेऊन थंडावा
जेव्हा पडे जोरदार
होते हिरवे अंगण
मृदगंध दारोदार
