जागा
जागा
द्यावी अंतरंगी जागा
आठवांना सुंदर गोड
उभे राहतील स्वप्नी
किती डोंगर अजोड
नका देऊ जागा मनी
घनघोर प्रसंगाना
घोडदौड आसवांची
पाय फुटे वेदनांना
ठेवा जागा प्रेमभाव
अर्पिताना जगी सारे
पाठी येते नातेगोते
दूर दिखाऊ सहारे
पहा स्वप्न जागेपणी
अंतरंगी मोठे ध्येय
मिळे जागा मनातली
मिळे सर्व योग्य श्रेय
दुसर्याच्या मनामधे
जेव्हा होते कधी जागा
होत जाती भेटीगाठी
जुळतोच प्रेमधागा
सारं काही जागेसाठी
नाही सोडवत मोह
संंसारात तडजोड
भरे आसवांचा डोह
