STORYMIRROR

vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

बावरे मन माझे

बावरे मन माझे

1 min
183

 कसे सांगू तुला मी

 मन हे माझे बावरे

कधी येशील जवळी

सख्या भेटण्या धावरे


बावरे मन माझे

लागे न लक्ष कशात

कसे समजावू मनाला

जीव गुंतला तुझ्यात


वा-याची झुळूक ही 

अलगत स्पर्शूनी जाता

सांगे कानात सांगावा

तुझ्या येण्याचा आता


बघ तो चंद्र नभीचा

त्याला आहे जाणीव

माझ्या मनाची त्याला

कळतेय ती उणीव


वाट पहाण्याची सख्या

वेड्या मनाची रीत

बघ सांजवेळ झाली

धुंद मनी झाली प्रीत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance