STORYMIRROR

Vijay Vishnupant Phadnis

Romance

3  

Vijay Vishnupant Phadnis

Romance

वसंतातील एक पहाट

वसंतातील एक पहाट

1 min
185

वसंतातील पहाटे,

वारा पानांत थांबला...

दवबिंदूच्या कोंदणात ,

स्वर मधूर गोठला...!१!


झाडांवरुनी काजवे, 

रात्रीतून दूर गेले...

सहवासात राहून,

तू कल्लोळ मुक्त केले...!२!


पाना आडून कोकीळ,

मधुरशी साद घाली...

उबदार सोनकिरणांत,

सकाळ रांगत आली....!३!


क्षण निरोपाचा येता, 

त्या पापण्या ओलावल्या...

ती रात परतुनी जाता,

सावल्या जवळी आल्या...!४!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance