खिन्न लेखणी...
खिन्न लेखणी...
श्रावण धारा भिजवूनी गेल्या ,
आठवणींचे अंकुर फुलवून गेल्या
अवखळ सरी निघुनी गेल्या !
मायेचे रांजण भरून गेल्या !
घुटमळली पावुले उंबरठ्यावरी ,
तीच्या स्वरांचा कानोसा घेत !
मन वेडे झाले होते ,
आठवांच्या तिच्या शब्दांच्या शोधात !
आठवणी शब्दांत उतरवण्या आधीच ,
लेखणी अविरत झरू लागली !
भळ भळणाऱ्या चिरदाह जखमेची ,
जणू तिलाच पहीली जाणीव झाली !