निळ्या आकाशात.....
निळ्या आकाशात.....
निळ्या निळ्या आकाशात ,
उंच उंच विहरावे ! धृ !
कल्पतरू च्या शिडीने ,
वाटे गगनी पोचावे !
पूर्व क्षितिजा वरील ,
सोनेरी किरणां सवे ! १!
निळ्या निळ्या आकाशात ,
उंच उंच विहरावे !
हाती कुंचला घेवूनी ,
आभाळी रंग भरावे !
अश्र्वेत ढगांची ठेव ,
अंगणी माझ्या सारावे !२!
निळ्या निळ्या आकाशात ,
उंच उंच विहरावे !
शुभ्र धवल ढगांचे ,
पुंजके बांधीत जावे !
मावळतीच्या दिशेला ,
रंगाची उधळण पहावे !३!
निळ्या निळ्या आकाशात ,
उंच उंच विहरावे !
निळ्या निळ्या आकाशात ,
उंच उंच विहरावे !
