STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Romance

3  

Dattatraygir Gosavi

Romance

वसंत आगमन

वसंत आगमन

1 min
176


पिवळ्या धम्म मोहरीचे,पिवळे पिवळे रान

पिवळ्या गव्हाळ ओंबीचे,नवं वस्त्र परिधान।।धृ।।


आज चाहूल वसंताची,पालवी कोरी घालं

पुजा विध्या देविची, ज्ञानाची माळ माळं।।१।।


सृष्टी सौंदर्य सोहळा,सुख समृद्धीचा लळा

नव चैतन्याचा मळा,वसंत पंचमीला माघ।।२।।


ब्रम्हदेवाची निर्मिती, विष्णू किर्ती पुजती

सृष्टी मानव जगती,वसंत पंचमीचा मान।।३।।


देवी चतुर्भुज दर्शनी, गोदा गंगेचा सन्मान

भल्या पहाटे उठूनी,होई गरम कुंडी स्नान।।४।।


गोडधोड पक्वां ने,नवं कामांची सुरुवात

हळदिच्या टिळाने ,गाऊ वसंताचं गाणं।।५।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance