तू
तू
तो पाऊस ,
आणि पावसात भिजणारी तू...
अल्लड जरा तो
खोड्या करणारी तू...
उसळणारा तो सागर,
फेसाळ त्याच्या लाटा....
वाऱ्याशी खेळणारे केस तुझे,
गालावर ओघळणाऱ्या बटा....
कधी तो शांत सागर,
अन् आसुसलेला किनारा...
आसुसलेले मन भेटीस तुझ्या,
त्या आठवणी घेऊन येणारा वारा...
आजही तुझ्या आठवणींत ,
त्या पावसात भिजतो,लाटांशी खेळतो...
रोज त्या किनाऱ्यावर जाऊन,
फक्त तुझीच वाट पाहत बसतो....

