तो आणि मी
तो आणि मी
अरे मित्रानो/मैत्रिणींनो
तुम्हाला एक सांगू का??
मी पण प्रेमात पडले त्याच्या
सगळं सांगते तुम्हाला
पण कळू देऊ नका घरी माझ्या
नाव वगरे विचारू नका
माहिती आहे मी सांगणार नाही तुम्हाला
तुम्हाला सांगितल्यावर
समजेल सर्व घरादाराला
पण इतका सांगते
त्याच्यामुळे आपली मैत्री नाही संपणार
आणि तुम्ही त्याच्यावर लाइन नका मारू
म्हणजे सगळं ठीक होणार
त्याचा स्वभाव सांगते
पण हसू नका माझ्यावर
कधी भेटला,कसा भेटला
असं काहीही विचारू नका
ताटात वाढलेल खा आणि घरी जा!!
तसा दिसायला बरा आहे
म्हणजे चेहरा भोळा लफडी सोळा
हुशार तर माझ्या पेक्षा खूप आहे
मी पण कोनापेक्षा कमी नाही
मी पण आखाद्याचिं लेक आहे
कालच्या एका स्टोरी मध्ये
सांगितल्या प्रमाणे
त्यालाही तैयार व्हायला वेळ लागते
आणि मला फक्त पावडर लावून
लवकर निघायची घाई असते
गरीब गाई सारखा चेहरा करून ठेवतो
मी मात्र कठीण परिस्तिथीत पण हसत असते
वेळेचा कट्टर समर्थक आहे तो
पण मी मात्र नेहमीच भेटायला उशीर करते

