STORYMIRROR

Ankita Akhade

Others

3  

Ankita Akhade

Others

निसर्गाचं कोडं

निसर्गाचं कोडं

1 min
119

निसर्गच कोडं 

काही कळेना मला

कोणाला एक हाथ नाही 

तर कोणाचा पाय 

एखाद्याला दोन्ही आहेत 

तर नाही माय 


कोणाकडे पैस्याचा पाऊस 

तर कोणाकडे दुष्काळ 

एकाच पैस्याने भरत नाही पोट 

तर एक धुनी भांडी करत

सांभाळतय बाळ 


ज्याच्या कडे पाऊस पैश्याचा 

त्याच्या ओठावर हसू नाही 

ज्याच्या कडे दुष्काळ पैश्याचा 

त्याच्या कडे प्रेम कमी नाही 


नसलेला हाथ पैस्याने 

घेता येतो विकत 

कितीही पैसे दिले तरी 

माय येत नाही परत 


पाय हि येतो नवीन

उभे हि आपण राहू

माय नाही माझी 

पायाला हाथ कोणाच्या लावू


Rate this content
Log in