मी हळूच लाजून सांगावं
मी हळूच लाजून सांगावं
त्याने जवळ येताच
मी हळूच लाजून सांगाव
कोणी तरी बघेल म्हणून
त्याचा कार्यक्रम टालाव
थोडं त्याने कौतुक करून
हरभऱ्याच्या झाडावर मला चडवाव
त्याचा इरादा कळताच
त्याला दूर मी लोटाव
किचेन मध्ये येऊन
त्रास मला दिला
आईने पाहताच म्हणाल्या
बायको चा बैल आला
जेवताना डोळ्यांचा
खेळ आमचा चालू होता
आईने ओरडताच
कोपऱ्यात बसून राहिला होता
मूड चांगला करून त्याचा
बोलायला त्याला लावले
बोट पकडायला दिले
आणि हाताला त्याने पकडले
खूप प्रयत्नाने त्याने
त्याचा हट्ट पूर्ण केला
नजर नको लागायला
आमच्या गोड संसाराला

