उशीर व्हायला नको
उशीर व्हायला नको
एखाद्याच्या आयुष्यात जातोय खरं
पण जाताना उशीर व्हायला नको
आयुष्यात जाताना खाऊ घेऊ कि मंगळसूत्र
पण घेऊन जाताना उशीर व्हायला नको
मंगळसूत्र घेतलय खरं
पण तिला घालायला उशीर व्हायला नको
मंगळसूत्राने दोन महिन्याचा मुहूर्त घेतला
पण मुहुर्तात उशीर व्हायला नको
मंगळसूत्राच्या दोन डौलांसारख आयुष्य
पण आयुष्याला जन्माला यायला उशीर व्हायला नको
स्क्रीनशॉट काढला तिने कविता माझी वाचायला
पण वाचायला तिला उशीर व्हायला नको

