आता निघायला हवं
आता निघायला हवं
मनात कोणी म्हणत असेल,आता निघायला हवं
उशीर होण्या आधी,घरी आपल्या जायला हवं
उपाशी असेल कोणी,त्याला जेवण द्यायला हवं
काळजीने त्याला पहिले,झोपवायला हवं
रात्री डोळे असतील जागे,मनातलं सगळं सांगायला हवं
हसू हि येईल कोणाला,सोबत त्यांच्या हसायला हवं
उशीर असेल झालेला सकाळी,टाइमावर जायला हवं
वेळ असेल शिल्लक,घरी फोन करायला हवं
मुद्दाम सुट्टी घेऊन,घरी राहायला हवं
वेळ तिच्यासोबत घालवून,लवकर निघायला हवं
