विठ्ठला तुझे मला वेड लागले
विठ्ठला तुझे मला वेड लागले
दिसायला चांगला तो
पण राधा त्याची झाली नाही
रंग त्याचा सावळा काळपट
रुक्मिणी सोडून त्याला गेली नाही
बासरीचे सूर त्याचे
सगळ्यांना जवळीक करी
कंबरेला हाथ लावून उभा
माझा श्री हरी
डोळ्यात त्याच्या प्रेम खरे
ओठावरी नाव वेगळे
मनी ध्यानी त्याच्या रुक्मिणी
प्रेम त्याचे तिला कळे
डोळ्यातले प्रेम तिला दिसायचे राहिले
ओठावर नाव तिचे घ्याचे राहिले
प्रेम काय ते विठ्ठलाने सांगितले
विठ्ठला तुझे मला वेड लागले
