आई..
आई..
हॉटेलात आईला घेऊन जायला
लाज वाटायची मला
तिची ती हिरवी साडी,हिरव्या बांगड्या
कपाळी लाल टिळा
तिच्या गावठी बोलण्याने
कमीपणा वाटायचा मला
तिने कधी ड्रेस घातलेला
आवडत नसेल मला
तीच हुशारपण
पचत नसे मला
ती साधीसुधी च बरी
असं वाटत मला
ती साधी असूनही
लाज वाटायची मला
तिला अडाणी बोलून
अपमान तिचा मी केला
तिला ओरडलो कधी दिल्या
शिव्या तिला
आई माझी मरताना
नावावर माझ्या घर करून गेली
साधी भोळी माझी आई
कधी मला नाही कळली
एकटाच आता घरात बसतो
हॉटेलात जातं नाही
आई गेल्यावर माझं ह्या
जगात कोणी उरलं नाही
साधी भोळी माझी आई
कशी मला कळली नाही
तिच्या शिवाय ह्या जगात
माझं कोणी उरलं नाही
