म्हाताऱ्या सारखं होऊ नका
म्हाताऱ्या सारखं होऊ नका
ए पोरांनो
लय अभ्यास करा,लय मोठे व्हा
आई बापाची मान वर करा
आयुष्यात सगळं करा
पण ह्या म्हाताऱ्या सारखं होऊ नका
अरे पोरांनो
आमच्या सारखं होऊ नका अडाणी
मानसान भेटाया रांग लावावी
पोटा पाण्यासाठी कधी गाडी पुसावी
पण त्या गाडीत माणसं आपली असावी
अरे पोरांनो
बापाला सपान पडलंय तुमच्या गाडीच
लय लाड करणार म्हणे त्यो त्याच्या नातीच
लेक गमावली मी जावयाला देऊन
पोरानं माझ्या राजवाडा बांदलाय गावात येऊन
अरे पोरांनो
कामं करताना लाज कशाला वाटायची
आपली भाकर दुसऱ्याला सुद्धा असते द्यायची
शिकायला पुढ-माग कशाला पाहायच
आपल्या डोळ्यातल आणि आपणच पुसायच
अरे पोरांनो
नका होऊ ह्या म्हाताऱ्यासारखं
सतत काय-बाय बोलणार
नातीला काय बी घेऊन देणार
पोरा,एकदा पंढरीला जाऊ म्हणणार
अरे पोरांनो
कधी तर राहून बघा आमच्या सारखं अडाणी
कधी तर ऐकावि तुकोबाचि वाणी
जग जय हरी म्हणल
तुम्ही तुमच्या गाडीतून बाहेर आल्यावर
आणि वारी पाई चालत गेल्यावर
अरे पोरांनो
जवानीत धुराळा उडवून द्या
म्हतार पणात तेच ऐकायचे आहे
आपल्या सोबतीला सोडू नका
तीच आपल्याला सांभाळणार आहे
