गुलाबा
गुलाबा
एखाद्याच्या प्रेमात तूटन खूप अवघड
गुलाबाला कसं जमत हे सार
एकटे होऊन जोडून दुसरी मन
गुलाबा जगणं हे किती न्यार
काटे तुझे टोचून जवळ आणतात आम्हाला
गुलाबा एकटेपणाची वेदना जाणवते का तुला?
तुझ्याकडे आहेत ना काटे
जे तुला टोचत नाहीत जवळ आणतात आम्हाला
तुझं कधी कोणी ऐकून घेतलं नाही
दुसऱ्या हातात देताच परतफेड केली नाही?
पहिल्या गुलाबांची कोणाला आठवण आली नाही?
सुगंध तुझा हि येतोच पण मोग्र्याला घाई सोसवली नाही
फेकून दिलं तुला
राग तेव्हा शांत झाला
जुळलेली मन दूर होऊन
गुलाब बेमान का झाला??
गुलाब माझा नाही कोणाला कळला
काटे टोचून अश्रू नाही गाळला
फेकून दिलं गुलाबाला
मने जोडून तो चुकला

