प्रेम बंधन
प्रेम बंधन
भेटून जा साजणी आज प्रेमात
ओठात गोडी तुझ्या लाज डोळ्यात
होताच सूर्यास्त झालाय अंधार
गंधीत वारा तुझा हात हातात
ऐकून घे पावसातील संगीत
माझे तुझे प्रेम आले सखी रंगात
थांबून जाऊ जरा वेळ बागेत
राणी गुलाबी तुझे ओठ ओठात
काटा उठे स्पर्श होता तुझा खास
बंदिस्त झालो तुझ्या प्रेम बंधात

