STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

प्रेमाची जादू...

प्रेमाची जादू...

1 min
148

जेव्हा तुझ्यासवे असते मी माझी नसते ,

प्रेमाचा जादूगार तू ती प्रेमाची जादू भासते ...

पाय टेकत नाही जमीनीला उंच झोके घेते,

मी उरत नाही माझ्यात ती प्रेमाची जादू भासते ...

सारखं तुझ्याकडे पहावे तुडूंब डोळ्यात बूडावे,

स्पर्शही पिसांसम तुझा ती प्रेमाची जादू भासते ...

झोपही तुझ्या दिशेने वळते माझ्यासवे रात्र भांडते,

चांदण्यावर नाव गोदंते तुझे ती प्रेमाची जादू भासते ...

डोळे मिटून चेहरा आठवते दूर जाण्या बावरते,

असा हृदयाचा जादूगार तू ती प्रेमाची जादू भासते ...

जेव्हा तुझ्यासवे असते मी माझी नसते ,

प्रेमाचा जादूगार तू ती प्रेमाची जादू भासते ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance