STORYMIRROR

Anita Bendale

Romance

3  

Anita Bendale

Romance

सोबत

सोबत

1 min
220

अशा हलक्या तिन्हीसांजेला रेती मध्ये पाय रोवून बसायचं... 

कधी सोबतीला त्याने असायचं...

तर कधी एकांता सोबत बसायचं...

अन मनाशीच बोलत राहायचं...


झुळझुळ करत लाटेने यायचं अन न विचारता पायांचं चुंबन घ्यायचं,

अंगाला गुदगुदल्या होऊन डोळे मीटे तोवर 

लाटेने परत गेलेले असायचं...

त्या लाटेला नजरेने शोधते... 


पण ती सागराची झालेली असते

त्या एकांताने पुसायचं...

खूप आवडतो ना तुला हा? 

साधी एक लाट पण तुझ्यासाठी ठेवत नाही

काय जादू त्याची...


ती इतक्या आवेगाने तुझ्याकडे येते

आणि पाय चुंबून निघून जाते,

त्याचे आकर्षण की त्याची भीती...


जन्म इतका सहज आहे का मनुष्याचा?

कोणी तरी, कुठे तरी, आधार घेत असेल तुझ्या श्वासाचा...

सोडून जाताना एकदा तरी मागे वळून पाहावं...

जन्म मृत्यू तील अंतर तेव्हा तुला कळावं.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance