STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

दारिद्र्य पीडित शेतकरी

दारिद्र्य पीडित शेतकरी

1 min
281

एक दारिद्र्य पीडित शेतकरी

ज्याने संपवल आपलं संपूर्ण कुटुंब 

चार दिसापासून सुरू होता

 इथे टिटविचा कहर  

 का नाही जाणवला

 तेव्हा संसारातील जहर 

 काय कसं घडत होतं 

उघड्या डोळ्या दिसत नव्हतं 

याला म्हणतात जणू वेशीपुढे

 काही चालत नव्हतं 

फासे फिरलें नशिबाचे 

दिस सरले सुखाचे 

उरला फक्त आक्रोश 

दुःखाच्या या खाई मध्ये 

जीव होऊन पडले बेहोश

 चिताच्या या ओळींमध्ये 

सुरवातीला होता बाप 

त्याच्या सगळ्या कर्मा मध्ये

 कुठलं होत शापित पाप

 नंतर दिसलप्रेत तीच

 जिने रक्ताचं पाणी करून

 जीवापाड शेत जपलं होतं 

आता आणखी पुढे होत्या

 इवल्या दोन काया 

माय बापाची सारी चिंता

 त्यांची सारी वेडी माया 

सगळं एक क्षणांत

 नाहीशी झालं सारंच सारं 

घर आज काळामागे लोटलं

 कुणाला कळावं कुणाला सांगावं

 आणि कोणी सांगावे काय होतं 

दुःख त्याचे कुठे हरवले 

सत्व दुःखाच्या खाईमध्ये 

कुठं गाडलं गेलं आस्तिव 


Rate this content
Log in