STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

दीपावली आली

दीपावली आली

1 min
300

दीपावली सण मांगल्याचा

 नवे दीप उजळविण्याचा 

नवे संकल्प करण्याचा

 उत्साहाचा आणि जल्लोषाचा 

चिवडा,करंजी,लाडू, 

चकली करण्याचा 

एकमेकांना शुभेच्छा देण्याचा

 उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट

 दिव्यांची आरास, फराळाचे ताट 

फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट 

आली दीपावली पहाट 

उजळेल आयुष्याची वहिवाट 

मिळो सर्वांना प्रगतीच्या

 पाऊल वाटेचा प्रकाश 

होऊ दे दृष्ट् शक्तीचा विनाश 

ज्योती जागल्या पणत्या लावल्या 

दिवाळीच्या सणी वाटते

 माझ्या मनी चांदण्या आल्या

 अंगनि रोषणाई मनात भरते

 रात चंदेरी फुलून जाते 

एक दिवा असा अंगणात रोज लावू 

उजळणाऱ्या पणती मधला 

थोडा उजेड होऊ, 

उटणं घासू अंगाला 

मळ काढू मनाचा

 गरिबांच्या आयुष्यात दीप उजळविण्याचा 

अनाथ मुलांना मायेचे छत्र देण्याचा 

पीडीताना सुखी क्षण देण्याचा 

वृद्धाश्रमातील माता पित्याना आधार देण्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन