STORYMIRROR

Anita Bendale

Others

3  

Anita Bendale

Others

सोबत

सोबत

1 min
290

 अशा हलक्या तिन्हीसांजेला

रेतीमध्ये पाय रोवून बसायचं... 

कधी सोबतीला त्याने असायचं...

 तर कधी एकांता सोबत बसायचं... 

अन् मनाशीच बोलत राहायचं...

 झुळझुळ करत लाटेने यायचं अन 

न विचारता पायांचं चुंबन घ्यायचं, 

अंगाला गुदगुदल्या होऊन 

डोळे मीटे तोवर 

लाटेने परत गेलेले असायचं...

 त्या लाटेला नजरेने शोधते... 

पण ती सागराची झालेली असते

त्या एकांताने पुसायचं... 

खूप आवडतो ना तुला हा? 

साधी एक लाट पण 

तुझ्यासाठी ठेवत नाही

काय जादू त्याची... 

ती इतक्या आवेगाने 

तुझ्याकडे येते 

आणि पाय चुंबून निघून जाते,

 त्याचे आकर्षण की त्याची भीती.


Rate this content
Log in