फक्त तुझ्याचसाठी
फक्त तुझ्याचसाठी
तुझ्याच साठी सर्व काही
आयुष्य पणाला लावावं
मोहक असा झरा होऊन
तुझ्या जीवनात झराव
तुझ्या चंदेरी आयुष्यात
आपण एकमेव असावं
एक बनून ध्रुव तारा
अढळ तेथे चमकावे
झरझर्त्या झरी मध्ये
भिजताना चिंब होताना
छान वाटतं
सहवास तुझा असताना
मन बेधुंद बेभान वाटतं
माझ्या मनाच्या क्षितिजावर
तुझ्या प्रेमाचं एक गाव वाटतं
माझ्या प्रत्येक पावली
साथ तू देतांना
तुझा प्रकाश् होऊन
तुला बिलगावं वाटत
मोहक स्मित तुझ्या शब्दांमध्ये
तुला न्याहाळत जावं वाटत
फक्त तुझ्याच साठी
अखेरच्या श्वासा पर्यंत
तुझं वहाव वाटतं
तुझ्या अंतरंगात गुंताव
वाटतं फक्त तुझ्याचसाठी,
फक्त तुझ्याचसाठी

