एक नात
एक नात
1 min
290
एक नात जन्माच ते फक्त असतं
आईच अस्तित्व असतं ममतेचं
वात्सल्याच येथे स्वार्थाला
मात्र स्थान नसतं
एक नातं रक्ताचं जे फक्त
असत भाऊ बहिणीच
ज्यात फक्त राज्य असत
मायेचं आपुलकीच
एक नात कर्मा च
जात असत कसोटीसाठी
जिथे कामाला येते धैर्य ,विरता
एक नात प्रेमाचं जिथे असतो
विश्वास
दोन शरीर अन एक श्वास
एक नात मैत्री च
महत्त्व आहे यात वेळेचं
पडल्या वेळेला लागणाऱ्या
आधाराकच
एक नात नाव नसलेलं
तरीही मर्यादित असलेलं
दोन मन जुळलेलं
