'लाल' रंग
'लाल' रंग
'लाल' रंग लावतो,
सखे तुझ्या गाली,
लाल रंगाने रंगली,
तुझ्या गालांची लाली...
लाव माझ्या गाली,
तू ही प्रीतीचा रंग,
एकमेकांमध्ये राणी,
चल होऊ आपण दंग...
लाल रंगाची कमाल,
तुझे सौंदर्य खुलले,
तुला पाहता वाटे,
बागेत गुलाबच फुलले...
मनमोहक हे रूप तुझे,
मला घालत असे भुरळ,
चल लाल डब्यात बसून,
फिरू लालबाग नी परळ...

