जांभळा
जांभळा
जांभळा-जांभळा-जांभळा रंग,
जांभळ्या रंगाने चिंब त्याचे अंग,
झाली मैत्री माझी लगेच त्याच्यासंग,
त्याच्या मनोहर रुपात झाले मी दंग...
त्याच्या जांभळ्या रंगाचे रहस्य मज कळेना,
त्याला हे विचारायची मला संधीसुद्धा मिळेना,
ह्या अद्भुत जीवाविषयी काहीएक समजेना,
त्याच्या रमणीय रंगाचे कोडे कसे उलगडेना...
जांभळ्या रंगात जे रहस्य गूढ दडले,
ते कसे शोधून काढू प्रश्न मजला पडले,
पण तेवढ्यातच विचित्र काही घडले,
खाटीवरून मी सरळ खाली गडगडले...
