तपकिरी
तपकिरी
1 min
122
तपकिरी रंग म्हणजे अवलंबित्व,
तपकिरी रंग म्हणजे निरोगीपणा,
तपकिरी रंग म्हणजे निसर्ग,
तपकिरी रंग म्हणजे आपलेपणा...
तपकिरी रंग जरी वेगळा असला,
तरी तो सदैव आहे आपला,
ह्या निसर्ग चक्रात हा रंग,
आहे चहूबाजूंनी व्यापला...
तपकिरी माती असे,
आम्हां लेकरांची माय,
तपकिरी रंगाची आहे,
आमची 'तांबु' नावाची गाय...
तपकिरी रंग आवडतो,
असे कित्येक जण सापडती,
तपकिरी रंगाचे कपडे घेण्या,
सारखे ते धडपडती...
तपकिरी रंग खरंच,
सुंदर आहे खूप,
तपकिरी रंगाने दिसे,
साजिरे सर्वांचे रूप...
