केशरी
केशरी
वीरांचे वंशज आम्ही,
दैवत अमुचे शिवराय,
'केशरी' अमुची शान,
लाल माती अमुची माय...
केशरी ध्वज लहरावून,
ह्या गगनासी बनवू पवित्र,
देण्यासी बळ आम्हां,
अवतरित होई सौमित्र...
रक्तात अमुच्या शौर्य,
अंगी जोश तारुण्याचा,
सदैव अमुच्या पाठीशी,
आशीर्वाद असे संतांचा...
हा केशरी रंग आम्हां,
लढण्यासी प्रेरणा देई,
मोठ्या अभिमानाने हा,
वीरांची कवने गाई...
