हिरवा
हिरवा
हिरवळ झाली दाही दिशांना,
समृद्धीचे प्रतीक असे,
ही हिरवळ पाहूनिया,
बळीराजा हळूच हसे...
झाले चीज कष्टाचे,
बळीराजला होई समाधान,
पोट भरतो अमुचे म्हणुनी,
चला करू बळीराजाचा सन्मान...
धन्य धन्य बळीराजा तू,
दिवसरात्र शेतात राबतो,
ओसाड उजाड माळरानाला,
हिरवेगार करून सोडतो...
आयुष्याच्या या वाटेवर,
हिरवाई पसरवू चला,
यशाच्या शिखरावर जाण्यास,
प्रेरणा देई हिरवळ मला...
