निळा
निळा
शांत वाहते सरितेचे पाणी,
ह्या पाण्याचा रंग निळा,
पाण्यामंधी सापडती मला,
रंगबेरंगी असंख्य शिळा...
सरितेच्या तटावरती येती,
सुंदर सुंदर मासोळी,
पाहुनी मजला येई मजा,
ह्या मासोळ्यांची रांगोळी...
निळ्या रंगाचे आकाश,
मजसी वेड लावून जाई,
निळ्या रंगात रंगून जाण्याची,
मज मना लागली घाई...
