काळा
काळा
काळा रंग माझा,
न आवडे कुणाला,
का असा मी आहे,
नेहमी वाटते मनाला...
तेवढ्यात मला कोणीतरी,
रडू नकोस म्हणालं,
काळया रंगाचे महत्त्व,
त्याच्या मुखातून समजलं...
काळा रंग शक्तीचे प्रतीक,
काळया रंगात अभिजातता,
जर काळा रंगच नसेल,
तर काय पांढऱ्याची महनियता?
माझी विठू माऊली,
श्रीकृष्ण सुद्धा सावळे,
तरी देखील त्यांची,
आज बांधली आहेत देऊळे...
काही फरक पडत नाही,
जरी असलं काळं तन,
पण चुकूनही नका देऊ,
व्हायला काळं आपलं मन...
काय काळं काय सफेद,
सगळे नजरेचे खेळ,
गोऱ्या गोमाट्याला काळं व्हाया,
उन्हात किती लागेल वेळ..?
