पिवळा
पिवळा
पिवळा रंग सूर्याचा,
आशेचा नी हर्षाचा...
अंधकारमय असो निशा,
उजळवून टाकी दाही दिशा,
सोबत नवचैतन्याची नशा,
पिवळा रंग व्यापी आकाशा...
पीत रंग आनंद पसरवी,
किती गाऊ ह्याची थोरवी?
हाची अमुचे जीवन उजळवी,
अंधकारासी ही दूर पळवी...
खरंच पिवळा रंग सूर्याचा,
आशेचा नी हर्षाचा,
नाजूक नी कोवळ्या अशा,
जीवनदायी सूर्यकिरणांचा...
