पांढरा
पांढरा
1 min
210
शांततेचे प्रतीक असे,
शुभ्र 'पांढरा' रंग,
साधेपणाची शिकवण देई,
हा रंग शुद्धते संग...
पांढरे कपडे घालुनी,
कोणी शुद्धतेचा संदेश देई,
तर ह्याच पांढऱ्या पोशाखात,
कोणी स्व-खुशीने फाशी घेई...
सर्व रंग एक जाहले,
अन् पांढरा रंग जन्मला,
शांत, शुद्ध , निर्मळतेचा,
त्याने आम्हां संदेश दिला...
