गुलाबी
गुलाबी
गुलाबी तिचे गाल,
वेड लाविती मजला,
कसं सांगू तिला,
तिजवर माझा जीव जडला...
तिच्या जगभरातल्या गप्पा,
चेहऱ्यावरील निरागस हसू,
वाटे दररोज तीच्यासवे,
तासन् तास बोलत बसू...
तिचे अल्लड तारुण्य,
गुलाबी साडीत खिळून उठते,
जेव्हा ती माझ्या समोर येते,
माझे हृदय जोरात धडधडते...
तिचे गुलाबी ओठ,
त्यातून निघती 'गुलाबी' बोल,
थोडेसे नखरेल असती,
तिचे नयन गोल गोल...
किती करू मी सांगा,
तिच्या सौंदर्याची स्तुती,
पण तिच्या मनाच्या सौंदर्यावर,
खरी जडली माझी प्रीती...

