STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Romance

3  

Vaishnavi Mohan Puranik

Romance

असा कोणी तरी हवा

असा कोणी तरी हवा

1 min
499

      असा कोणी तरी हवा 

माझ्यावर मनापासून प्रेम करणारा

माझ्या सुखातच आपला सुख मानणारा

      असा कोणी तरी हवा

जो सतत माझा विचार करें

माझ्या आठवणीतच त्याचे क्षण सरे

      असा कोणी तरी हवा

माझा मूर्खपणा हसून सहन करणारा

मी चिडले रागवले तरी प्रेमानी समजूत काढणारा

      असा कोणी तरी हवा

ठेच मला लागली तरी पाणी त्याचा डोळयात यावं

काटा मला रुतला तरी घाव त्याचा काळजाला व्हावं

      असा कोणी तरी हवा

ज्याच्या हदयावर असावे माझ्या प्रेमाचे ठसे

माझ्या इतका प्रिय त्याला कोणीच नसे

      असा कोणी तरी हवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance